कृषि उत्पन्न बाजार समिती, कोपरगांव

पुर्वेतिहास व पार्श्वभूमी

कोपरगांव येथे बाजार समितीच्या स्थापनेपुर्वी सुध्दा बाजारपेठ होती. कोपरगांव बाजारपेठ म्हणुन तीचे नावलौकीक होते. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने शेती उत्पादकाचे हीत संरक्षणाच्या दृष्टीने मुंबई सरकारने सन १९३९ साली बॉम्बे अ‍ॅग्रिकल्चरल प्रोडयुस मार्केटस अ‍ॅक्ट, १९३९ हा कायदा पास केला व सदरच्या कायदयान्वये कोपरगांव बाजार समितीची स्थापना करण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा भुसार व कांदा पिकांच्या उत्पादनासाठी देशात अग्रेसर आहे.

बाजार समितीची स्थापना व अधिसुचना नंबर

बाँबे अ‍ॅग्रिकल्चरल प्रोडयुस मार्केटस अ‍ॅक्ट, १९३९ नुसार नुसार कोपरगांव बाजार समितीची स्थापना १६/०३/१९४९ रोजी करण्यात आली.

प्रत्यक्ष कामकाजास सुस्बात

कोपरगांव बाजार समितीचे प्रत्यक्ष कामकाज १६/०३/१९४९ रोजी करण्यात आले.

बाजार समिती स्थापन्याचा उद्देश

शेतकरी बांधवांच्या मालास योग्य बाजारभाव मिळावे, त्यांचा माल विकण्याची व्यवस्था उत्तम व्हावी व ती जवळपास असावी. निनिराळया मार्गाने होणारी आर्थिक फसवणुक व पिळवणुक होवु नये व अनधिकृत रिती व सुट वगैरे प्रकार बंद व्हावेत, चोख वजनमाप होउन मालाचा योग्य मोबदला रोख रूपाने त्यांच्या पदरात पडावा व इतर संबंधित घटकांच्या हिताची सुध्दा जपवणूक व्हावी इत्यादी उद्देशासाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली.

बाजार क्षेत्र

कोपरगांव बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील अहिल्यानगर जिल्हयातील कोपरगांव या तालुक्यातील ७९ गांवे आहेत.

बाजार आवारे

कोपरगांव बाजार समितीचे मुख्य बाजार आवार कोपरगांव असुन बाजार समितीचे कोपरगांव या ठिकाणी २४ एकर २८ गुंठे इतके क्षेत्र असुन उपबाजार आवार तिळवणी येथे २ एकर क्षेत्र आहे.

नियमित शेतीमाल

बाजार समितीने खालील शेतमाल नियमित केलेले आहे.

अ. क्र.वस्तूचे नाव अ. क्र.वस्तूचे नाव अ. क्र.वस्तूचे नाव
गुळ १८कापुस ३५लिंबु
गहू १९कांदा ३६डाळींब
ज्वारी २०मोसंबी ३७घास
बाजरी २१आंबा ३८कडबा
हरबरा २२संत्री ३९अंडी
मठ २३केळी ४०कोंबडी
मुग २४द्राक्षे ४१पाळीव खाद्य पक्षी
तूर २५टरबुज ४२चामडी
जवस २६खरबुज ४३कातडी
१०करडी २७चिक्वु ४४बैल
११शेंगा २८बटाटे ४५गाय
१२शेंगादाणे २९रताळी ४६म्हैस
१३सुर्यफुल बी ३०टोमॅटो ४७रेडा
१४तीळ ३१पेरू ४८घोडा
१५मेथी ३२पालेभाज्या ४९शेळया
१६एरंडी ३३फळभाज्या ५०मेंढया
१७उडीद ३४भात(तांदुळ) ५१सोयाबिन

मालविक्री पध्दत

महाराष्ट्र राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती, कोपरगांव ही संस्था ग्रामीण भागामधील लोकांची विश्वास पात्र अशी बाजारपेठ आहे. बाजार समितीच्या मुख्य व दुय्यम बाजार आवारावर विक्रीस येणारा नियमित शेतीमाल हा अग्रक्रम पध्दतीनुसार व वस्तुवार क्रमवारीने (लाईनशीर) उभा केला जातो व उघड लिलावाने क्रमवार विक्री केला जातो. प्रगत शेतीतंत्र, नवीन बियाणे, खते यांचा योग्य वापर सुरू झाल्याने कांदा शेतीमालाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीमालाची विक्री ही उघड लिलाव पध्दतीने व बाजार समितीच्या सेवक व शेतकरी बांधवासमक्ष चुरशीने होते. विक्रेत्यास बाजारभाव योग्य न वाटल्यास तो झालेला लिलाव स्थगित करून त्या मालाची विक्री दुस-या दिवशी करू शकतो.